नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; आणखी एक जण एटीएसच्या ताब्यात

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण; आणखी एक जण एटीएसच्या ताब्यात

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण आणि नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात आखणी एकाला एटीएसने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. जालन्यामधून एटीएसने गणेश कपाळे या तरुणाला ताब्यात घेतले आहे. जालन्यामध्ये गणेश कपाळे याचे डीटीपी आणि झेरॉक्सचे दुकान आहे. या दुकानावर एटीएसने छापा टाकत कम्प्युटर आणि हार्ड डिस्क जप्त केली आहे.

आरोपींच्या घरातून शस्त्रसाठा जप्त 

या दोघांचाही दाभोलकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा एटीएसने संशय व्यक्त केला आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील वासुदेव सूर्यवंशी याने गाडी पुरवठा केला असल्याचे एटीएसने सांगिले आहे. एटीएसने या दोघांच्या घरी केलेल्या छापीमारीमध्ये बॉम्ब तयार करण्याचे साहित्या, शस्त्रसाठा आणि वेगवेगळ्या शहरांचे नकाशे जप्त केले आहेत. तर लोधी याच्या घरातून ३ गावठी बॉम्ब, ३ मोबाईल,४ पेन ड्राईव्ह आणि २ नंबर प्लेट जप्त केल्या. तर सूर्यवंशीच्या घरातून १ डीव्हीडी आणि २ मोबाईल जप्त केले. पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये स्फोट घडवून आणण्याचा यांचा कट होता.

आतापर्यंत ८ आरोपींना अटक 

नालासोपारा येथील सोपारा गावात राहणाऱ्या वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर मुंबई एटीएसने मध्यरात्री छापा टाकून ८ देशी बॉम्ब जप्त केले होते. त्यानंतर एटीएसने वैभव राऊतसह पाच जणांना बेकायदा शस्त्र, स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी विविध कलमांनुसार अटक केली. वैभव राऊतला सर्वात आधी पोलिसांनी अटक केली. या तपासा दरम्यान पोलिसांनी सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरला आणि शरद कळसकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर धुळ्यातून दोन जणांना अटक करण्यात आली होती. आता जालन्यातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी स्फोट घडवण्याचे षडयंत्र यांनी रचले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

First Published on: September 12, 2018 1:55 PM
Exit mobile version