राष्ट्रवादीनं शिवसेनेसोबत युती जाहीर करावी आमच्या शुभेच्छा, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीनं शिवसेनेसोबत युती जाहीर करावी आमच्या शुभेच्छा, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुरुवातीपासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोलेंनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेस स्वतंत्र लढत असल्यास शिवसेना-राष्ट्रवादी सोबत लढेल असे म्हटलं होते. यावर नाना पटोलेंनी शुभेच्छा देत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी युती लवकर जाहीर करावी असं प्रत्त्युतर दिले आहे. आम्ही जर आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय तर कोणाच्या पोटात का दुखावं असा सवालही शिवसेनेला नाना पटोलेंनी केला आहे. काँग्रेसने जनमानसात जाऊन काम केलं असल्याचेही नाना पटोले सांगायला विसले नाहीत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखामधील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोना काळात स्वबळाचा नारा दिला तर लोकं जोड्यानं हाणतील अशी टीका काँग्रेसवर करण्यात आली आहे. स्वबळाचा नारा शिवसेनेकडूनही देण्यात आलाय परंतु काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असल्यास कुणाला का त्रास झाला पाहिजे? असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तसेच आमच्यावर कोणी टीका करत असेल तर त्याला आम्ही महत्त्व देत नाही असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

युतीच्या शुभेच्छा – नाना पटोले

काँग्रेस स्वबळावर लढत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोबल निवडणूक लढेल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होत. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती करावी आणि त्या युतीची घोषणाही लवकर करावी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असा टोला नाना पटोलेंनी लगावला आहे.

सरनाईकांच्या पत्रातील मुख्य मुद्दा तपास यंत्रणा

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातील मुख्य मुद्दा हा तपास यंत्रणांचा गैरवापर आहे. भाजपसोबतच्या युतीबाबतही या पत्रात वक्तव्य करण्यात आलं आहे. असा प्रश्न नाना पटोलेंना करण्यात आला होता. उत्तरात नाना पटोलेंनी म्हटलं आहे की, प्रताप सरनाईक यांच्या पत्रातील मुख्य मुद्दा हा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करुन राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देत आहे. या यंत्रणांच्या गैरवापराला आम्ही निषेध करतोय अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

First Published on: June 21, 2021 3:49 PM
Exit mobile version