अपयशी फडणवीस सरकारला जनता जागा दाखवणार – नाना पटोले

अपयशी फडणवीस सरकारला जनता जागा दाखवणार – नाना पटोले

Maharashtra Assembly Monsoon Session live 2022 congress nana patole slams cm eknath shinde devendra fadanvis on maharashtra heavy rain marathwada

विधानसभा निवडणुीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महा पर्दाफास यात्रेला सुरुवात केली आहे. मंगळवारी ही यात्रा भंडारा येथे धडकली. भंडारा येथील सभेत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. ‘२०१४ पासून जर फडणवीस सरकारने खरोखरच सिंचन, शेती, शहर विकास, दुष्काळ, बेरोजगारी निर्मुलन, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, विविध जातीसमुह यांच्या विकासासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी काही टक्के जरी काम केले असते तर भाजप सरकारला राज्यात पंचतारांकीत सुविधा उपभोगत महाजनादेश यात्रेची नौटंकी करण्याची गरज भासली नसती. जनता आपल्या कारभारावर प्रचंड नाराज आहे हे या सरकारला पोलीस यंत्रणेकडून समजले आहे. त्यामुळेच हा अवाढव्य खर्च करून जनतेला भुलथापा देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अशा सरकारच्या भूलथापा आणि खोटारड्या सरकारला जनता बळी पडणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखविणार’ असे पटोले म्हणाले. मंचावर यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, श्री पांडे, जिया पटेल, मधुकर लिचडे, सीमाताई भुरे, डॉ अशोक ब्राह्मणकर, होमराज कापगते, जिल्हा परिषद सभापति प्रेम वनवे, रेखाताई वासनिक, अजय तुमसरे, जिल्हा महासचिव महेंद्र निंबार्ते, मुकुंद साखरकर, शिशिर वंजारी, रणवीर भगत, राजकपूर राऊत, शंकर तेलमासरे, हंसाताई खोब्रागडे, अनीक जमा पटेल, भूषण टेम्भूर्णे, धनराज साठवणे आदी उपस्थित होते.

‘फडणवीस सरकारने शिक्षकांचा विश्वासघात केला’

यापुढे बोलतांना नानाभाऊ पटोले म्हणाले कि, ‘गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदानीत शाळेचे हजारो शिक्षक प्रचलित नियमानुसार अनुदान मिळण्यासाठी आंदोलन करीत आहे. २०१४ च्या निवडणुकीपुर्वी भाजपाच्या नेत्यांनी या शिक्षकांना १०० टक्के अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेऊन सर्व विनाअनुदानीत शाळेचे शिक्षक भक्कमपणे भाजपाच्या पाठीशी उभे राहीले. मात्र पाच वर्ष पुर्ण झाले तरीही या शिक्षकांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या नाहीत. अनेक वर्ष आंदोलन करुनही न्याय न मिळाल्याने गोंदीया जिल्ह्यातील केशव गोबडे तसेच नंदुरबार जिल्हातील जितेंद्र पाटील या दोन शिक्षकांनी न्यायाच्या प्रतिक्षेत प्राण सोडला.’ राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारसाठी गंभीर विषय नाही. आता पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांचा मृत्यू सुध्दा सरकारसाठी गंभीर विषय राहीला नसल्याची टिका नानाभाऊ पटोले यांनी केली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात पगाराशिवाय काम करतांना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परीस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम पडत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा – गिरीश महाजन जोकर मंत्री – नाना पटोले

First Published on: August 27, 2019 9:43 PM
Exit mobile version