गद्दारी केलीत तर याद राखा राणेंचा कार्यकर्त्यांना दम

गद्दारी केलीत तर याद राखा राणेंचा कार्यकर्त्यांना दम

नारायण राणे

जिल्ह्यात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये गद्दारी केलीत तर याद राखा, असा दम केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. राणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. त्यात राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने त्यांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करताना गद्दारी केलेली चालणार नाही, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले. गद्दारी करणार्‍यांनी दुसरे काही करायला लावू नका, असेही राणे यांनी दम दिला.

कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णपणे सत्ता भाजपची पाहिजे. मला येणार्‍या निवडणुकीत गद्दारी अजिबात चालणार नाही. माझ्या निवडणुकीत जे झाले ते आता खपवून घेणार नाही. गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच; पण दुसरे काय करायला लावू नका. कार्यकर्त्यांना इशारा देताना नारायण राणे म्हणाले, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका यामध्ये सत्ता भाजपचीच पाहिजे. मला इतरांकडे या संस्था गेलेल्या चालणार नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीत तीन विरूद्ध एक आहोत. मला ४६ जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेत निवडून गेलेले पाहिजेत. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवा.

नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी.नड्डा यांना दाखवून द्या की सिंधुदुर्ग जिल्हात शंभर टक्के भाजप आहे. हा सिंधुदुर्ग जिल्हा शंभर टक्के नारायण राणे यांच्यासोबत आहे हे दाखवून द्या. फितुरी तर मी खपवूनच घेणार नाही. उद्धव ठाकरे काय बोलले ते तुम्ही चिपीत बघितले. मला शत-प्रतिशत भाजपा हवाय. मी डिसेंबरमध्ये शिवसेनेसह अन्य लोकांना प्रवेश देणार आहे.

First Published on: October 31, 2021 6:57 AM
Exit mobile version