Narendra Dabholkar Murder Case: डॉ. दाभोलकर हत्याकांडातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: डॉ. दाभोलकर हत्याकांडातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: डॉ. दाभोलकर हत्याकांडातील आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालायने जामीन मंजूर केला आहे. २० ऑगस्ट २०१३ मध्ये झालेल्या दाभोलकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप विक्रम भावेवर आहे. आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांनी बंदूकीने गोळी झाडून दाभोळकरांची हत्या केली. दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता. या हत्येसाठी आरोपी भावेने जागीची रेकी करत या दोघांनी मदत करत त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवला असा आरोप भावेविरोधात पोलिसांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाचत न्या. एस.एस.शिंदे व न्या.मनीष पितळे यांनी भावे याचा जामीन मंजूर करत त्याला एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा दोन हमीदारांच्या अटीच्या पूर्ततेवर त्याची सुटका होणार आहे. भावे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवासात आहे.

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिश पितळे यांच्या विभागीय खंडपीठाने भावेला जामीननंतरही रोज पुणे पोलीस स्थानाकाच हजेरी लावण्याचे त्याचबरोबर पुढचे दोन महिन्यातील आठवड्याचा दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे, भावेचा पासपोर्ट सीबीआयकडे जमा करण्यात येणार आहे. आरोपीने पुण्यातील विशेष न्यायालयाच्या हद्दीतच रहावे, खटल्याला उपस्थित राहण्याचे तसेच साक्षीदारावर दबान न आणण्याचे बेकायदा कृत्य न करण्याचे, पीडितांच्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारे संपर्क करू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये. शिवाय अशाच प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यात यापुढे सहभागी होऊ नये, आदेश दिले आहेत. परंतु सबीआयचे वकील संदेश पाटील यांनी या आदेशाल स्थगिती देण्याची विनंती केली परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉक घेत असताना पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना अटक केली होती. यात कळस्करच्या जबाबानंतर सीबीआयने आरोपी भावे आणि अॅड. संजीव पुनाळेकर यांना २५ मे २०१९ रोजी अटक केली. दाभोलकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप विक्रम भावेवर आहे. दाभोलकरांच्या खुनासाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल नष्ट करण्यातही त्यानं मदत केल्याचा आरोप त्याच्यावर होता. परंतु या प्रकरणातून आरोपी पुनाळेकरला पुण्याचा सत्र न्यायालयाने जून २०१९ ला जामीन दिला. मात्र भावेचा जामी अर्ज पुणे विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्य़ाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्जावर मंजूर दिली आहे. मात्र या जामीनाच्या आदेशावर स्थगिती मिळावी ही सीबीआयची मागणी कोर्टाने नाकारली.


 

First Published on: May 7, 2021 9:46 AM
Exit mobile version