‘नाशिक १५१’ : संगीत, साहित्य, कृषी, क्रिडा महोत्सवाची पर्वणी

‘नाशिक १५१’ :  संगीत, साहित्य, कृषी, क्रिडा महोत्सवाची पर्वणी

जिल्ह्याला 150 वर्षेपूणे होण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याची शक्तीस्थळे जगासमोर आणण्याच्या हेतूने ‘नाशिक 151’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १ मे पासून वर्षभर साजर्‍या होणार्‍या या महोत्सवात संगीत, साहित्य, पर्यटन, क्रिडा, कृषी आदि  महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांसाठी समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

‘नाशिक 151’ कार्यक्रम नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, नाशिक 151 या कार्यक्रमांची सुरूवात 1 मे 2021 पासून सुरू होणार असून पुढील वर्षीच्या 1 मे 2022 पर्यंतच्या कालावधीत नाशिक जिल्ह्याची ओळख सांगणारे विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कालावधीत ‘नाशिक 151’ या महोत्सवात वर्षभर राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. महोत्सवासाठी शासनाकडून २५ कोटी रूपयांचा निधीही प्राप्त झाला आहे.

असे असेल स्वरूप
अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र सुरू करणे तसेच नाशिक जिल्ह्याची ओळख सांगणारे संगीत, क्रीडा, पर्यटन, शेती, साहित्य अशा विविध क्षेत्रातील महोत्सव साजरे करणे अशा तीन टप्प्यात नाशिक 151 या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळया भागातील अनेकविध कला, संस्कृती, शेती, उद्योग, चित्रपट, संगीत, लोककला यांना एक व्यासपीठ मिळण्याच्या उद्देशाने कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र तयार करणे, अपूर्ण प्रकल्प पूर्ण करून ते प्रकल्प शाश्वत स्वरूपात विकासीत करण्यासाठी आवश्यक असणार्‍या नाविन्यपूर्ण कल्पना याबैठकीत मांडण्यात आल्या.

First Published on: February 16, 2021 12:59 PM
Exit mobile version