नाशिक महापालिकेत तातडीने होणार ६३५ कर्मचार्‍यांची भरती

नाशिक महापालिकेत तातडीने होणार ६३५ कर्मचार्‍यांची भरती

कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना ती अटोक्यात आणण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने महापालिकेत ६३५ कर्मचार्‍यांच्या भरतीस मान्यता दिल्याचे महत्वपूर्ण आदेश महापालिकेस शुक्रवारी (दि. १६) प्राप्त झाले. यासंदर्भातील माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
नाशिक महापालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर कोरोना संदर्भात काम करत असताना पालिकेस मनुष्यबळ कमी पडत होते. पालिकेने शासनाकडे आकृतीबंध सादर केलेला होता. या आकृतिबंधाच्या प्रस्तावातील बाबी शासनाने विचारात घेतल्या आहेत. तसेच महापालिकेच्या व्याप्ती व सर्व विभागांचे कामकाजाचे स्वरूपाच्या अनुषंगाने विविध विभागांना आवश्यक असलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांची मागणी विचारात घेण्यात आली. आस्थापनेवर विविध संवर्गातील रिक्त झालेली पदे भरून काढण्याच्या दृष्टीने सादर केलेल्या प्रस्तावांचा आढावा घेऊन शासनाने नाशिक महापालिकेच्या गट-अ ते गट-ड मध्ये आवश्यक असलेल्या पदांचा विभागनिहाय आकृतीबंधातील पदांना शासनाने मान्यता दिली.

Kailas Jadhav

आरोग्य विभाग अग्निशमन विभाग अभियांत्रिकी विभाग, लेखा परिक्षण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग या पाच विभागातील ३७ संवर्गातील ६३५ पदांना शासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या उपसचिवांया स्वाक्षरीने पारित झाला आहे. यामुळे पालिकेचे विविध कामे करण्यास मनुष्यबळ उपलब्ध होईल.

– कैलास जाधव, आयुक्त, नाशिक महापालिका

First Published on: April 16, 2021 8:40 PM
Exit mobile version