धक्कादायक : मालेगावात २२ वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू

धक्कादायक : मालेगावात २२ वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली असून २४ तासात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईचा आकडा ७२ इतका आहे. दरम्यान, मालेगावात कोरोनाचा विळखा वाढत आहे. शनिवारी सकाळी मालेगावातील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधित तरुणीचा धुळे येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत मालेगावातील दोन जणांचे मृत्यू झाले असून कोरोनाबाधितांची संख्या नऊ झाली आहे.

२२ वर्षीय तरुणीचा मृत्यू

शनिवारी सकाळी अजून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल आहे. मालेगाव येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय तरुणीला हृदयासंबंधी आजार होता. तिला ७ एप्रिल रोजी धुळे येथील रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. तिच्यात कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्याने तिचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनास तिचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, आज, शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच मालेगावमध्ये सध्या ९ कोरोना रुग्ण सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ८३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

राज्यात २४ तासात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली आहे. आज राज्यात २४ तासात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे यामध्ये मुंबईचा आकडा ७२ इतका आहे.


हेही वाचा – धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने नाशकात एकाची आत्महत्या


First Published on: April 11, 2020 12:57 PM
Exit mobile version