नाशिककरांना औरंगाबाद, पुण्यात ‘नो एन्ट्री’

नाशिककरांना औरंगाबाद, पुण्यात ‘नो एन्ट्री’

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव विचारा घेता पुणे, औरंगाबादसह राज्यातील विविध जिल्हयात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करतांना आता नाशिकमधून पुणे, औरंगाबादला प्रवास करू इच्छिणार्‍यांना १९ जुलै पर्यंत ‘नो एन्ट्री’ असणार आहे.

गेल्या पाच महीन्यांपासून कोरोनाने राज्यात कहरच केला आहे. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे अवघ्या काही क्षणांत सर्व काही स्तब्ध झाले. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बस, रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आली. काही राज्यांमध्ये विमानसेवा सुरू करण्यात आली असली तरी, अद्याप बस, रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली नाही. लॉकडाऊन जारी करताच सीमा बंदीही करण्यात आली. त्यामुळे एका जिल्हयातून दुसर्‍या जिल्हयात जाणार्‍यांना बंदी करण्यात आली. या लॉकडाऊनमुळे राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक नागरीक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. या सर्व नागरीकांची प्रशासनामार्फत राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली. ‘मिशन बिगीन अंतर्गत’ लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरी अद्याप सीमा बंदी कायम आहे. त्यामुळे अजूनही एका जिल्हयातून दुसर्‍या जिल्हयात जाण्यासाठी इ- पास घेणे बंधनकारकच आहे. कोरोना रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता पुणे, औरंगाबादसह राज्यातील विविध जिल्हयांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पुणे शहरात कोरोना रूगणांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे त्यामुळे याचा संसर्ग नाशिकमध्ये होऊ नये याकरीता नाशिकहून पुणे, औरंगाबादला जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. याकरीता ई – पास साठी अर्ज करणार्‍यांना परवानगी नाकारण्यात येत आहे. तसेच पुणे, औरंगाबादहून नाशिकमध्ये येणार्‍यांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. १९ जूलैपर्यंत हे निर्बंध असतील. मात्र वैद्यकिय कारणास्तव किंवा काही अपरिहार्य कारणास्तव या जिल्हयांमध्ये जाणे आवश्यक असेल अशाच अर्जांचा विचार यात केला जात असल्याचे नोडल अधिकारी निलेश श्रींगी यांनी सांगितले.

First Published on: July 14, 2020 5:26 PM
Exit mobile version