कोरोना रुग्णवाढीत नाशिक राज्यात टॉप

कोरोना रुग्णवाढीत नाशिक राज्यात टॉप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात असले तरी शहर व जिल्ह्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णवाढीचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर नाशिकमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. रुग्णवाढीच्या प्रमाणात बुलढाणा दुसर्‍या क्रमांकावर असून, प्रमाण २९ टक्के रुग्णवाढीचे प्रमाण आहे. तर अहमदनगर तिसर्‍या क्रमांकावर असून, प्रमाण २७ टक्के प्रमाण आहे. गडचिरोली आणि कोल्हापूरमध्ये सर्वात कमी रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण २ टक्के आहे.

रविवारी दिवसभरात एक हजार ३५६ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक नाशिक शहरात ९४२ असून, नाशिक ग्रामीण २६९, मालेगाव १२६ आणि जिल्हा बाहेरील रुग्ण १९ आहेत. दिवसभरात नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात ५२३ रुग्ण बरे झाले. नाशिक जिल्ह्यात आठ हजार ४८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये सर्वाधिक नाशिक शहर सहा हजार १९०, नाशिक ग्रामीण एक हजार २२४, मालेगाव ५७८ आणि जिल्हा बाहेरील ५६ रुग्ण आहेत. जिल्ह्यात एकूण २ हजार १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक शहर एक हजार ६३, नाशिक ग्रामीण ८६६, मालेगाव १८१ आणि जिल्हा बाहेरील ६0 रुग्ण आहेत. दिवसभरात एक हजार ६३१ संशयित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत.

First Published on: March 14, 2021 11:58 PM
Exit mobile version