कल्याणच्या १७ वर्षीय मुलासोबत नाशिकच्या महिलेचे अनैतिक कृत्य; गुन्हा दाखल

कल्याणच्या १७ वर्षीय मुलासोबत नाशिकच्या महिलेचे अनैतिक कृत्य; गुन्हा दाखल

नाशिक : शहरातील ३२ वर्षीय विवाहित महिलेने १७ वर्षीय मुलासोबत अनैतिक संबंध ठेवत त्याला दारुचे व्यसन लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने ठाणे जिल्ह्यातील कल्याण मधील कोळसे वाडी पोलीस ठाण्यात नाशिकमधील महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलगा आईसोबत सुटीनिमित्त कल्याण येथून नाशिकला नातेवाईकांकडे आला होता. नातेवाईकांनी त्याला परिसरातील लोकांची ओळख करुन दिली होती. दरम्यान, त्याची नातेवाईकांच्या घराच्या शेजारील ३२ वर्षीय महिलेशी ओळख झाली. या महिलेने पीडित मुलाशी ओळख वाढवली. ती त्याच्याशी सारखी भावनिक बोलत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायची. त्यातून दोघांची ओळख वाढत गेली. तो तिच्या घरी जावू लागला. पीडित मुलाशी महिला घरात कोणीही नसताना शारीरिक स्पर्श करायची. हा स्पर्श मुलाला नवीन असल्याने तो तिच्याकडे आकर्षित झाला.

त्यातून तिने त्याला दारूचे व्यसन लावत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. काही दिवसांनी पीडित मुलगा परत ठाण्याला गेला. महिलेसोबत अनैतिक संबंध सुरु झाल्याने त्याच्या वागण्यात बदल झाला होता. ही बाब मुलाच्या आईच्या लक्षात आली. याप्रकरणी मुलाच्या आईने सोमवारी (दि.३०) तात्काळ ठाणे जिल्ह्यातील कोळसे वाडी पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसांना आपबिती सांगितले. त्यानुसार पोलिसांनी नाशिकच्या महिले विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोळसे वाडी पोलीस करत आहेत.

First Published on: January 31, 2023 4:20 PM
Exit mobile version