एमएचटी-सीईटी परीक्षा स्थगित

एमएचटी-सीईटी परीक्षा स्थगित

नाशिक : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांनीही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व बी . एस्सी. (कृषी) या अभ्यासक्रमांची एमएचटी-सीईटी परीक्षा तसेच एलएलबी (पाच वर्षे) अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा स्थगित केली आहे. येत्या 13 ते 23 एप्रिल दरम्यान ही परीक्षा होणार होती.

बंदचा अभ्यासावर परीणाम
बारावीची लेखी परीक्षा संपल्यानंतर विविध शिकवणी चालकांकडून सीईटी, जेईई या परीक्षांसाठी कॅश कोर्सचे नियोजन केले होते. या परीक्षांतील प्रश्न अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमातील असल्याने विषयांची उजळणी करण्याचे नियोजन या कोर्सद्वारे केले होते. मात्र, शाळा, महाविद्यालयांसोबत खासगी क्लासेसही बंद झाल्याने या उजळणी अभ्यासावर परीणाम झाला आहे. सीईटी सेलमार्फत मॉक टेस्टचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे विद्यार्थी प्रश्न सोडविण्याचा जास्तीत जास्त सराव घरी बसून करु शकतात.

First Published on: March 29, 2020 4:33 PM
Exit mobile version