नाशिक पुणे विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून

नाशिक पुणे विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली नाशिक पुणे विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एअर इंडीयाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरव्दारे येत्या २७ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीला पुणे सेवेसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्यात आल्याने नाशिक पुन्हा एकदा हवाईसेवेव्दारे पुण्याशी कनेक्ट होणार आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या उडान योजनेच्या पहील्या टप्प्यात नाशिक ते पुणे या विमानसेवेचा सामावेश करण्यात आला होता. हा मार्ग एअर डेक्कन कंपनीला देण्यात आला. मात्र या कंपनीकडून अतिशय ढिसाळपणे सेवा देण्यात आली. मोठा प्रतिसाद मिळूनही कंपनीच्या गलथान कारभारामुळे प्रवाश्यांमध्ये असमाधानच होते. त्यानंतर ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली. त्यामुळे कंपनीची सर्व उडडाणे जमिनीवर आली. अखेर कंपनीला दिलेला हा स्लॉट अन्य कंपनीला देण्यात यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रिय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे केली होती त्याची दखल घेवून पुढच्या टप्प्यात सूनावणीत त्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. उडाणच्या तिसरया टप्प्यात या मार्गासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. त्यास अलायन्स एअर प्रतिसाद दिला. त्यामुळे कंपनीची निवड त्यासाठी करण्यात आली. सध्या अलायन्स एअरव्दारे नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे. आता कंपनीव्दारे नाशिक पुणे सेवा दिली जाणार असल्याने नाशिक पुणे प्रवास अवघ्या एक तासात शक्य होणार आहे. सध्या रस्तेमार्गे पुण्याला जाण्यासाठी किमान पाच तास लागतात.

अशी असेल सेवा

पुणे विमानसेवा सोमवार ते शनिवार राहणार आहे.  ७० आसनी क्षमता असलेल्या या विमानात पन्नास टक्के जागा या उडान योजनेंतर्गत  राखीव असतील. उडान अंतर्गत १६२० रूपये तिकिट दर निश्चित करण्यात आला आहे. ओझरहून दुपारी २.५५ मिनिटांपी उडाण घेणार असून ३.५ मिनीटांनी विमान पुणे विमानतळावर उतरेल. पुन्हा ४.२० मिनीटांनी पुणे विमानतळाहून उडाण घेवून ५.२. मिनिटांनी ओझर विमानतळावर उतरेल.

उद्योगवाढीस चालना

गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा सुरू होण्याकरीता केंद्रिय मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. अखेर एअर अलायन्सव्दारे २७ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. यामुळे जिल्हयातील व्यापार, उद्योगाला मोठी चालना मिळेल. – खासदार हेमंत गोडसे

First Published on: September 27, 2019 8:17 PM
Exit mobile version