नाशिक बाजार समितीत 15 कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक बाजार समितीत 15 कोटींची उलाढाल ठप्प

मुंबई, गुजरातसह राज्याच्या विविध भागात भाजीपाल्याचा पुरवठा करणार्‍या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि.11) कडकडीट बंद पाळण्यात आला. शेतकर्‍यांसह व्यापार्‍यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्याने दिवसभरात 15 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.
उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या स्वरुपाचे फलकही बाजार समितीच्या आवारात लावण्यात आले. त्याला प्रतिसाद देत शेतकर्‍यांनी आज भाजीपाला किंवा इतर धान्य बाजार समितीत विक्रीसाठी आणले नाही. त्यामुळे नाशिक बाजार समितीत सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कडकडीत बंद पाळला. नाशिकमधून मुंबई, गुजरात, डहानू या ठिकाणी पाठवण्यात येणारा भाजीपाला आज पाठवला जाणार नाही. शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत या बंदमध्ये सहभाग घेतला. त्यांचे अभिनंदन करतो.
-देविदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

First Published on: October 11, 2021 11:27 AM
Exit mobile version