मान्सूनपूर्व पावसाची नाशकात १ तास बॅटिंग; मान्सून कधी दाखल होणार?

मान्सूनपूर्व पावसाची नाशकात १ तास बॅटिंग; मान्सून कधी दाखल होणार?

नाशिक : शहरात रविवारी (दि.४) दुपारी 12 ते दीडच्या सुमारास अचानक आलेल्या मान्सुनपूर्व पावसाने नाशिककरांची काही काळ चांगलीच दाणदाण उडवून दिली होती. पावसाच्या अचानक हजेरीने नागरिक काही काळ भांबावून गेले.
रविवारी (दि.4) सुट्टीचा दिवस असल्याने आठवड्याभराची खरेदी करण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडले होते. रविवार कारंजा, मेनरोड, भद्रकाली, शालिमार, पंचवटी कारंजा याठिकाणचे बाजार फु असताना अचानक पावसाने दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान हजेरी लावली. यामुळे नागरिकांना दुकानांचा आडोसा घ्यावा लागला. तर, दुकानदारांची नुकत्याच दुकानासमोर मांडलेल्या वस्तुंना पावसाच्या पाण्यापासून वाचवितांना दमछाक झाली.

नाशिकरोड, जेलरोड, रविवार कारंजा, मेनरोड, भद्रकाली, शालीमार, पंचवटी कारंजा या भागात दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने 1 तास जोरदार बॅटिंग केली. बालगोपाळांनी पावसात भिजत सुट्टी एन्जॉय केली. घरातही 24 तास फॅनचा आसरा घेणार्‍या ज्येष्ठांनी पावसात भिजत काही काळ एन्जॉय केला. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकचे तापमान सातत्याने 40 च्या वर आहे. उन्हाच्या झळांमुळे नाशिककर चांगलेच त्रासले आहेत. पशुपक्ष्यांपासून झाडांनाही उन्हाच्या झळया बसत असल्याचे चित्र आहे. उन्हामुळे कासाविस होणारा जीव तंड करण्यासाठी सातत्याने उसाचे गुर्‍हाळ, लिंबु पाण्याचे गाडे, थंड पेयांची दुकाने याठिकाणी नाशिककर गर्दी करीत आहे. मात्र काल अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सुखद धक्का दिला. पाउस आला असला तरी नाशिकच्या तापमानात कुठलाही फरक पडला नाही. दोन दिवस असेच ढगाळ वातावरण राहाणार असून, मान्सूनचा पाउस नाशिकमध्ये साधारणत: 15 जूनच्या आसपास येणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

मान्सून केरळच्या किनारपट्टीवर 

मान्सून ४ किंवा ५ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. मान्सूनची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत आहे, खासकरून शेतकरी. कारण जून महीना सुरू झाला तरी नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई कमाल तापमान 35 अंशांवर आहे, तर राज्यातील काही भागात पारा 40 अंशांवर पोहचले आहे. त्यामुळे उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. केरळच्या किनार्‍यापासून मान्सून केवळ 400 किमीवर आहे. सध्या मान्सून दक्षिण अरब सागर, मालदीव, कोमोरिन क्षेत्रात असून दक्षिण बंगालची खाडी व पूर्व मध्य बंगाल खाडीत मान्सूनची आगेकूच सुरू आहे. ४ किंवा ५ जूनला मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मान्सून उशीरा येत असल्यामुळे जुनच्या पहिल्या आठवड्यात गती कमी असेल, मात्र दुसर्‍या आठवड्यात वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार मान्सून कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ईशान्येतील सात राज्यांत दिसून येईल.

उष्णतेची लाट आवश्यक

जमिनीतील आर्द्रता संपून ती मान्सूनला आकर्षित करण्यासाठी मान्सूनपूर्व हंगामात उष्णतेची लाट आवश्यक असते. परंतु, यावर्षी मार्च आणि मेदरम्यान 12 टक्के पाऊस पडल्यामुळे तसे होऊ शकले नाही. यावर्षी सर्वाधिक १३६ टक्क्यांहून जास्त पाऊस मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्रामध्ये पडला. त्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार व झारखंड वगळता देशातील उर्वरित भागात एप्रिल-मेदरम्यान उष्णतेची लाट दिसून आली नाही.

First Published on: June 5, 2023 1:54 PM
Exit mobile version