मुक्त विद्यापीठाची 10 कोटी मदत

मुक्त विद्यापीठाची 10 कोटी मदत

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मुख्यमंत्री सहायता निधीस 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी गुरुवारी (दि.16) ही घोषणा केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कुलगुरुंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यापीठातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे, तज्ज्ञ सदस्य डॉ.संजय खडककर, वित्त अधिकारी एम. बी. पाटील उपस्थित होते. विद्यापीठाने यापूर्वीही किल्लारीतील भुकंपग्रस्तांना भरीव मदत केली होती. तसेच गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना विद्यापीठाने विशेष पथक पाठवून धान्यसामुग्रीचे वाटप केले होते.
&
विद्यापीठाचे अभिनंदन
विद्यापीठांचा आपत्कालिन निधी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुक्त विद्यापीठाने दहा कोटी रुपये दिले. त्यासाठी विद्यापीठाचे मनस्वी आभार मानत असल्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

First Published on: April 16, 2020 7:27 PM
Exit mobile version