लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉक करणे पडले महागात; 14 जणांवर गुन्हे

लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वॉक करणे पडले महागात; 14 जणांवर गुन्हे

मॉर्निंग वॉक शरीरासाठी आरोग्यदायी असला तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स ठेवा, असे आवाहन पोलीस वारंवार करत आहे. तरीही, पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत मॉर्निंग वॉक करणाऱ्या 14 जणांवर रविवारी गंगापूर पोलिसांनी कारवाई केली आहे.

करोनाच्या शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे. करोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा व पोलीस सर्वोतोपरी खबरदारी घेत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स ठेवावा, घरीच बसा, असे वारंवार पोलीस करत आहेत. तरीही काहीजण कुटुंबियांसह सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग वॉक करत आहेत. रविवारी (दि.29) सकाळी गंगापूर रोडवर काहीजण मॉर्निंग वॉकला आल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना समज देत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. नागरिकांनी करोना आजार आटोक्यात येईपर्यंत घराबाहेर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुदगल यांनी केले आहे.

First Published on: March 29, 2020 7:33 PM
Exit mobile version