नाशकात १५ किलो चांदीचा शिवपाळणा महोत्सव होणार साजरा

नाशकात १५ किलो चांदीचा शिवपाळणा महोत्सव होणार साजरा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंत्तीनिमित्त नाशिकमधील छत्रपती सेनेतर्फे प्रथमच 15 किलो चांदीचा शिवपाळणा महोत्सव साजरा होत आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा शिल्पा सोनार यांच्या हस्ते रविवारी (दि. 13) या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

छत्रपती शिवरायांची जयंती प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जाते. ज्या पद्धतीने देवदेवतांच्या जयंती उत्सवानिमित्त पाळणा उत्सव साजरा केला जातो. त्याच धर्तीवर शिवजन्मोत्सव अध्यक्षा शिल्पा सोनार यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीला पाळणा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न छत्रपती सेनेच्या माध्यमातून केला जात आहे. त्याअनुषंगाने शहराच्या इतिहासात प्रथमच छत्रपती शिवरायांच्या जयंत्तीनिमित्त 19 फेब्रुवारीला सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी पाळणा उत्सव साजरा होणार आहे.

यासाठी मयूर अलंकार यांच्याकडून सुमारे 15 किलो चांदीचा पाळणा तयार करण्यात आला आहे. दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. उत्सवास केवळ महिलांना प्रवेश असणार आहे. यावेळी एमी चड्डा, विद्या चव्हाण, छाया कळमकर, प्रिया कुमावत, रजनी राजदेरकर, मयूरी पाटील, किशोर तिडके, परीक्षित एप्रे, राजेंद्र ठाकरे,
सुदर्शन निमसे, अविनाश पाटील, प्रवीण भामरे, धीरज खोळंबे, संदीप निगळ, सागर पवार , गणेश पाटील, गणेश पगार, राहुल ठाकूर, राहुल तिडके, भूषण तनपुरे, अभिजित पवार, सागर जाधव, श्याम पाटील आदी उपस्थित होते.

First Published on: February 14, 2022 8:50 AM
Exit mobile version