Corona : दिवसभरात २२ रुग्णांचा मृत्यू

Corona : दिवसभरात २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला असून, बुधवारी (दि.30) दिवसभरात 756 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १ हजार 243 नवे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक ग्रामीण ४४४, नाशिक शहर ७७2, मालेगाव १६ आणि जिल्ह्याबाहेरील ११ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक शहर ४, मालेगाव २ आणि नाशिक ग्रामीणमधील १६ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ८8 टक्के रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 8 हजार 115 रुग्णांवर उपचार सुरु आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण ४ हजार 10, नाशिक शहर ३ हजार 518, मालेगाव ४७6 व जिल्ह्याबाहेरील 111 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजवर 66 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १५ हजार710, नाशिक शहर 47 हजार 216, मालेगाव ३ हजार 106, जिल्ह्याबाहेरील ३59 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात २ हजार 76 हून अधिक संशयित रुग्ण उपचारार्थ विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले. त्यात जिल्हा रुग्णालय ६, नाशिक महापालिका रुग्णालय १ हजार 890, एमव्हीपी रुग्णालय ८, मालेगाव रुग्णालय २४, नाशिक ग्रामीण रुग्णालय 148 रुग्ण दाखल झाले.

First Published on: September 30, 2020 8:46 PM
Exit mobile version