बर्ड फ्लू रोखण्यासाठी २८ रॅपिट टास्क फोर्स सज्ज

बर्ड फ्लू रोखण्यासाठी २८ रॅपिट टास्क फोर्स सज्ज

Bird Flu: परभणीत ३४०० कोंबड्यांची कत्तल

जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागानं तज्ज्ञांच्या २८ रॅपिड टास्क फोर्स नियुक्त केल्या आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांनी संशय वाटल्यास तातडीनं पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचे एकही प्रकरण पुढे आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी. बर्ड फ्ल्यू कोंबड्यांपासून पसरत नाही. तर, त्याला मध्यस्थी प्राण्यामुळे याची लागण होत असते. महाराष्ट्रात प्रादूर्भावाची शक्यता फार कमी आहे. तरीही, तातडीची उपाययोजना म्हणून पशुसंवर्धन तज्ज्ञांच्या २८ टीम नियुक्त करुन त्यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टास्क फोर्समधील तज्ज्ञांना पीपीई किटसोबत औषधेही पुरवली जाणार आहेत.

First Published on: January 12, 2021 8:12 PM
Exit mobile version