जिल्ह्यात ७० गावांना जूनअखेर ३२ टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात ७० गावांना जूनअखेर ३२  टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात अद्यापही चांगला पाऊस झालेला नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ग्रामीण भागातील पाणीबाणी बघता जिल्हा प्रशासनाकडून महिना अखेरीस टँकरला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ७० गावे-वाड्यांना ३२ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मान्सूने यंदा वेळेआधी जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र, जूनच्या पहिल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाचा उघडीप दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे सध्या ७ तालुक्यातील ६३ हजार १४४ नागरिकांना ३२ टँकरच्या सहाय्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक ८ टँकर येवल्यात सुरू आहेत. बागलाणमध्ये सहा, चांदवड, मालेगाव व सुरगाण्यात प्रत्येकी ५ टँकर धावत आहेत. तसेच देवळ्यात २ व नांदगावी एक टँकर सुरू आहे. त्याचबरोबर गावांसाठी ४६ व टँकरसाठी ११ अशा एकूण ५७ विहिरी प्रशासनाने अधिग्रहीत केलेल्या आहेत. प्रशासनाकडून टँकर व विहिरींच्या माध्यमातून तुर्तास ग्रामीण जनतेची तहान भागविली जाते. परंतु, शासन निर्णयानुसार दरवर्षी जून अखेरीस जिल्ह्यातील सर्व टँकर बंद करायचे असतात. पण सध्याचा लांबलेला पाऊस आणि ग्रामीण जनतेची पाण्यासाठी होणारी वणवण टाळण्यासाठी प्रशासनान टँकरला मुदतवाढ देऊ शकते.

First Published on: June 30, 2021 1:00 PM
Exit mobile version