हेल्मेट नसल्याने शहरात ३९७ जणांचा बळी

हेल्मेट नसल्याने शहरात ३९७ जणांचा बळी

helmet

शहरात विनाहेल्मेटमुळे पाच वर्षांत ३९७ वाहनधारकांना जीव गमवावा लागला आहे. ७८२ अपघातांत ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, यात ४६७ व्यक्ती दुचाकीचालक होत्या. त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेटच घातले नसल्याचे दुर्दैवी वास्तव आहे.

वेगाने विस्तारणार्‍या नाशिक शहरात वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, शहरात वाहतूक नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे वाहतूक कोंडीसह जीवघेण्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या अपघातांमुळे अनेकांना अपंगत्व आले आहे. तसेच, अनेक कुटुंबियांनी कर्ता पुरुषही गमावला आहे.अपघातामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त पांण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ हा उपक्रमही सुरु आहे. पोलीस आयुक्तांनी आता या उपक्रमाचा दुसरा टप्पा १५ ऑगस्टपासून सुरू केला असून, त्यात विनाहेल्मेट दुचाकीचालकांना दंड न करता त्यांचे समुपदेश केले जात आहे.आतापर्यंत एक हजारहून अधिक दुचाकीचालकांचे समुपदेशन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये करण्यात येऊन त्यांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व समजावण्यात आले आहे.

हेल्मेटची सवय करा, अन्यथा तिसरा टप्पा असेल अवघड

शहरात १ ऑक्टोबरपासून हेल्मेट ड्राईव्ह अधिक तीव्र होणार आहे.विनाहेल्मेट कारवाईच्या पहिल्या टप्प्यात नो हेल्मेट, नो पेट्रोल, दुसर्‍या टप्प्यात नो हेल्मेट, दोन तास समुपदेशन केले जात आहे.आता तिसर्‍या टप्प्यात १ ऑक्टोबरपासून अधिक तीव्र कारवाई केली जाईल. यात विनाहेल्मेट दुचाकीचालकास शासकीय कार्यालय पार्किंगमध्ये वाहन उभे करता येणार नाही. शहरातील कोणत्याही गॅरेजमध्ये वाहन सर्व्हिसिंग केले जाणार नाही. या संदर्भात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय लवकर आदेश काढणार आहेत.

९८० जणांचे समुपदेशन

ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये जुलै २०१५ पासून १ लाख ४५ हजार नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. यात ७५ हजार ३५७ शाळेतील मुलांसह ४० हजार ८३५ चालकांचा समावेश आहे.पार्कमध्ये मयूर बागूल व सोनाली पवार समुपदेशक असून, भीमाशंकर धुमाळ व्यवस्थापक आहेत. विनाहेल्मेट कारवाईअंतर्गत मंगळवारअखेर २४ सत्रांतर्गत ९८० दुचाकीचालकांचे समुपदेशन केले गेले.

हे करावे

हे करु नये

First Published on: September 22, 2021 7:01 PM
Exit mobile version