नाशिक जिल्ह्यात ४५ लाख नागरिकांचे लसीकरण

नाशिक जिल्ह्यात ४५ लाख नागरिकांचे लसीकरण

नाशिक – जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने सुमारे ४५ लाखांचा टप्पा गाठला. यात ३२ लाख नागरिकांना पहिला डोस, तर १२ लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनावर लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. जिल्हयात जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. सुरूवातीच्या टप्प्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत मे महिन्यात ४५ वर्षांवरील नागरीकांनंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अपुर्‍या लसीमुळे केंद्रावर गोंधळ निर्माण होऊ लागल्याने १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण काही दिवस थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर पुन्हा १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

जिल्हयात आतापर्यंत ४४ लाख ७५ हजार ७०१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यात ३२ लाख ६५ हजार ३०३ नागरिकांना पहिला तर १२ लाख १० हजार ३९८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

First Published on: October 21, 2021 11:59 PM
Exit mobile version