पंचवटीत सिलिंडर स्फोटात ६ व्यक्ती गंभीर

पंचवटीत सिलिंडर स्फोटात ६ व्यक्ती गंभीर

पंचवटी- पेठरोडरील कुमावतनगरात आज सकाळच्या सुमारास गॅस गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात एकाच घरातील ६ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असुन, सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमावतनगरात साडेसहा ते पाऊणे सात वाजेच्या सुमारास परराज्यातून टाईल्सची कामे करणाऱ्या कामगारांच्या घरात गॅस गळती होऊन स्फोट झाला. गुरुवारी रात्री घरातील व्यक्तींकडून गॅस व्यवस्थित बंद करण्याचे राहून गेले. दरम्यान, सकाळी सकाळी घरातील एका व्यक्तीने काडीपेटी पेटवताच गॅसचा भीषण स्फोट झाला. त्यात घरातील लवलेश धरम पाल (रा.अलादात पूर, जिल्हा उत्तर प्रदेश), अखिलेश धरमपाल, विजयपाल फत्तेपूर (उत्तर प्रदेश), संजय मौर्य (रा. अलादात पूर फतेहपूर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर फतेहपूर, उत्तर प्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपुर, उत्तर प्रदेश, सर्वांचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघा जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

First Published on: October 22, 2021 12:14 PM
Exit mobile version