नाशिक शतकाच्या उंबरठ्यावर; कोरोना रुग्णांत आठने वाढ, 6 बळी

नाशिक शतकाच्या उंबरठ्यावर; कोरोना रुग्णांत आठने वाढ, 6 बळी

मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी (दि.19) रात्री 9 वाजता जिल्हा रुग्णालयास 38 रुग्णांचे रिपोर्ट मिळाले असून त्यातील 8 रिपोर्ट मालेगावातील पॉझिटिव्ह रुग्णांचे आले आहेत. मालेगावात आता कोरोनाबाधित 85 रुग्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात 99 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून त्यातील 6 जणांचा बळी गेला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी मालेगावात रुग्णालयात संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मालेगावात कोरोनाबाधित रुग्ण वाढण्यासह मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, नाशिक शहरातील गोविंदनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.

First Published on: April 19, 2020 8:54 PM
Exit mobile version