आरटीओतर्फे फळे, भाजीपाला वाहतुकीसाठी 1104 वाहनांना परवानगी

आरटीओतर्फे फळे, भाजीपाला वाहतुकीसाठी 1104 वाहनांना परवानगी

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होण्यासाठी उभारले नियंत्रण कक्ष

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला वाहतूक करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)तर्फे 26 ते 31 मार्च या कालावधीत 1104 वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी फळे व भाजीपाला नाशिक, मुंबईसह गुजरातमध्ये विक्रीसाठी नेतात. करोना आटोक्यात येण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मालवाहू वाहनांना वाहतूक करताना अडचणी येत आहे. त्यांची अडचणी सोडवण्यासाठी आरटीओने पुढाकार घेतला आहे.  अत्यावश्यक सेवेेनुसार फळ, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या 1104 वाहनांना आरटीओतर्फे परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देताना लायसन्स व आधारकार्डची तपासणी केली जात आहे. वाहनचालकांनी फळे व भाजीपाला दिल्यानंतर परतीचा प्रवास करताना वाहन रिकामे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यसीमेवर चालकांसाठी जेवण

दिंडोरी तालुक्यातील अनेक शेतकरी शेतमाल गुजरातमध्ये विक्रीस नेतात. लॉकडाऊनमुळे मालवाहू वाहनांमधून वाहतूक करण्याची अडचणी निर्माण झाली होती. त्यासाठी आरटीओतर्फे सितना, बोरगाव राज्यसीमेवर कार्यालय सुरू करण्यात आहे. या ठिकाणी 26 ते 31 मार्च या कालावधीत 204 वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी चालकांसाठी आरटीओतर्फे मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

सहा दिवसात परवानगी मिळालेले वाहने 

कार्यालयात प्रत्यक्षरित्या 362 वाहने, ईमेलद्वारे 538 वाहने आणि सीटना, बोरगाव येथे 204 वाहने असे एकूण 1104 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.  

First Published on: March 31, 2020 7:54 PM
Exit mobile version