आरोग्य विभागात 905 जागा रिक्त

आरोग्य विभागात 905 जागा रिक्त

 जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट क्र संवर्गातील 819 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकाया पदांचा समावेश आहे.या पदांच्या भरतीसाठी आरोग्य विभागाने मार्च 2019 मध्ये जाहीरात प्रसिध्द केली होती. तसेच महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्जांची मागणी केली होती. परंतु, कोरोनाच्या काळात भरती प्रक्रिया रखडली आणि महापरीक्षा हे पोर्टलही बंद पडले. त्यामुळे राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. या सर्व्हिस प्रोव्हायडरची निवड केली. त्यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, अपंगांसाठी राखीव 3 टक्के जागांऐवजी त्यांना 4 टक्के जागा देण्यात येणार आहेत. त्यासाठी 30 जून रोजी स्वतंत्र जाहीरात प्रसिध्द केली जाईल. त्याव्यतिरीक्त जाहीरात प्रसिध्द होणार नसल्याने उमेदवारांना स्वतंत्ररित्या अर्ज करता येणार नाही. यापूर्वी प्रसिध्द झालेल्या जाहीरातीच्या आधारे पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने एका पदासाठी एका व्यक्तिला एकाच जिल्ह्याची निवड करावी लागेल. त्यासाठी वेळ दिला जाणार आहे. पाचही संवर्गांच्या परीक्षा या 7 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

एसईबीसी प्रवर्ग खुल्या गटात

आर्थिक व सामाजिकदृष्ठ्या मागास अर्थात एसईबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयालयाने रद्द ठरवल्यामुळे या संवर्गातील उमेदवारांचा खूल्या गटात समावेश केला आहेत. तसेच आर्थिकदृष्ठ्या दुर्बल प्रवर्गात (ईड्ब्लूएस) या आरक्षणाचा त्यांना लाभ घेता येईल. त्यासाठी 1 जुलै ते 21 जुलै 2021 या कालावधीत विकल्प उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. संबंधित उमेदवाराला परीक्षेपूर्वी ‘ईडब्लूएस’ प्रवर्गाचे प्रमाणपत्र जिल्हा निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक केले आहे.

पदनिहाय रिक्त जागा

First Published on: June 16, 2021 4:29 PM
Exit mobile version