नाशिक मनपा भूसंपदानाचा ९१ फाईल्स नगररचना संचालकांकडे रवाना

नाशिक मनपा भूसंपदानाचा ९१ फाईल्स नगररचना संचालकांकडे रवाना

नाशिक : गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेने केलेल्या जवळपास आठशे कोटींच्या भूसंपादन प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी पुण्यातील नगररचना संचालक कार्यालयाकडे ६५ प्रकरणांशी संबंधित ९१ फाईलींची कागदपत्रे शुक्रवारी सोपवल्याचे वृत्त आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या तक्रारीनंतर महापालिकेने गेल्या दोन वर्षांमध्ये केलेल्या जवळपास ८०० कोटी रुपयांच्या भूसंपादनाची चौकशी सुरू झाली आहे.नगर भुजबळ यांच्या पत्रावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असून त्या अनुषंगाने राज्याच्या नगरविकास खात्याने पुणे येथील रचना संचालकांकडे चौकशीची जबाबदारी दिली आहे. पुढील सात दिवसात चौकशी समितीचा अहवाल शासनाला देणे अपेक्षित आहे. या चौकशी संदर्भातील पत्र गुरुवारी महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर आयुक्त पवार यांनी तातडीने नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत गेल्या दोन वर्षात झालेल्या भूसंपादनाशी संबंधित ९१ फाईल्स पीडीएफ स्कॅन करून सॉफ्ट कॉपीद्वारे चौकशी पथकाकडे सुपूर्द केल्या. या प्रत्येक फाईलचा अभ्यास करून भुजबळ यांनी पत्राद्वारे घेतलेल्या आक्षेपामध्ये तथ्य आहे का याचा निष्कर्ष काढला जाणार आहे.

First Published on: May 7, 2022 2:27 PM
Exit mobile version