करोनाविरोधात अमेरीकेत उभारली गुढी

करोनाविरोधात अमेरीकेत उभारली गुढी

नाशिक : मराठी नवीन वर्षाच्या स्वागताला करोनाची बाधी झालेली असताना नाशिकच्या देसाई कुटुंबाने अमेरीकेत करोना विरोधात गुढी उभारुन मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. भारत करोना मुक्त होण्यासाठी नागरीकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.
अभोणा (ता.कळवण) येथील रहिवासी प्रा अशोक जगन्नाथ देसाई यांचे सुपुत्र स्वप्नील देसाई हे पत्नी मेघासह अमेरीकेतील न्यूजर्सी या शहरात राहतात. त्यांनी मराठमोळा सण साजरा करत सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.
करोनाने जगभरात थैमान घातले असून अमेरीकेतही मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. या परिस्थितीत स्वप्नील व मेघा हे दोघेही गेल्या 15 दिवसांपासून घरातच आहेत. दोघेही आयटी इंजिनिअर असल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ करतात. अमेरीकेत एकाही व्यक्तीला बाहेर पडू देत नसल्याचे त्यांनी सांगितले. करोनापासून बचाव करण्यासाठी किमान 30 दिवस घरात बंदिस्त राहणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींना कळकळीची विनंती आहे की, पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेच्या हितासाठी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. त्याचे पालन करुन आपला देश करोनामुक्त करुया, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर आपले मराठी सण साजरे करुन हिंदू संस्कृतीचे जतन परदेशात करत असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

First Published on: March 26, 2020 4:39 PM
Exit mobile version