वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन आला, लोखंडी फ्रेम चिमूकल्याच्या अंगावर पडल्या, आणि….

वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन आला, लोखंडी फ्रेम चिमूकल्याच्या अंगावर पडल्या, आणि….

नाशिक : वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन आलेल्या १८ वर्षीय मुलाच्या अंगावर बांधकाम साईटवरील मिनी क्रेनच्या सपोर्टसाठी वापरलेला लोखंडी फ्रेम पडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना ३१ मार्च रोजी सकाळी ११.२० वाजता अर्चित गॅलक्सी कन्ट्रक्शन साईटवर, गंगापूररोड, नाशिक येथे घडली. याप्रकरणी पुनित उत्तम मडावी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी ठेकेदार, सुपरवायझर, इंजिनिअर, बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अरुण पुनित मडावी (वय १८, रा. मूळ रा. बोरतलाव, ता. डोगरगड, जि. राजनदगाव, छत्तीसगड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनित मडावी यांचा मुलगा अरुण जेवणाचा डबा घेऊन आला होता. त्यावेळी बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. साईटवरील मिनी क्रेनसाठी वापरण्यात येणारी लोखंडी फ्रेम खाली पडली. ती फ्रेम अरुणच्या अंगावर पडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. त्यानंतर पुनिअ मडावी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार करीत आहेत.

अर्चित गॅलक्सी कन्ट्रक्शन साईटवर दोन ग्रुपमार्फत बांधकाम केले जात आहे. कामगाराच्या मुलाच्या अंगावर क्रेनचे लोखंडे पडल्याचे समजताच घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या नसल्याचे समोर आले आहे. बांधकाम साईटवर सेफ्टी इंजिनिअर नव्हता की कामगारांना सुरक्षेसाठी हेल्मेट देण्यात आले नव्हते. : नितीन पवार, तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक, गंगापूर

First Published on: April 5, 2023 3:51 PM
Exit mobile version