अल्पवयीन तरुणीने दिला बाळाला जन्म; युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

अल्पवयीन तरुणीने दिला बाळाला जन्म; युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक : म्हसरूळ शिवारातील ज्ञानदीप आधार आश्रमात संस्थाचालकानेच सहा मुलींचे लैगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच देवळाली कॅम्प परिसरात एका मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने तिने बाळा जन्मही दिला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी व संशयित आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत संशयित आरोपी घरात घुसला. त्याने दोन वेळा तिच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितली तरी तुझ्या जीवाचे बरे वाईट करीन, अशी धमकी त्याने पीडित मुलीला दिली होती. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने बाळाला जन्मही दिला. याप्रकरणी मुलीच्या आईने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.

First Published on: November 28, 2022 12:24 PM
Exit mobile version