चिंचोली येथील जवानाचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

चिंचोली येथील जवानाचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

चिंचोली येथील जवानाचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

नाशिकरोड येथील योगेश मनोहर लांडगे (वय ३१) या लष्करी जवानाचे सोमवारी दुपारी गुजरात-गांधीनगर येथे कर्तव्यावरून घरी जात असताना अपघाती निधन झाले. चिंचोली येथील स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

चिंचोली (ता. सिन्नर) येथील योगेश मनोहर लांडगे हे मराठा लाईट इंन्फट्रीच्या गांधीनगर येथील युनिटमध्ये कार्यरत होते. सोमवारी कर्तव्यावरून घरी परतताना दुचाकीला अपघात होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. सिन्नर येथील महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले योगेश अकरा वर्षापूर्वी लष्करात सामील झाले, मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. अपघातात निधन झाल्याची माहिती प्रशासनाने कुटुंबियांना दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आहेत.

First Published on: July 2, 2019 7:05 AM
Exit mobile version