जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढले

जिल्ह्यात १९ हजार मतदार वाढले

voters

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत मयत व दुबार अशी ५६ हजार दुबार नावे वगळण्यात आली असून, या मोहीमेनंतर १९ हजार ३४३ मतदार वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ४५ लाख २४ हजार ६६३ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहीमेत पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे शुद्धीकरण, तसेच नवमतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी (दि. ३१) सायंकाळी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या ४५ लाख २४ हजार ६६३ पर्यंत पोहोचली आहे. यात पुरूष मतदार २३ लाख ६६ हजार ४९५, तर महिला मतदारांची संख्या २१ लाख ५८ हजार १३३ पर्यंत पोहोचली आहे. याशिवाय तृतीयपंथी मतदारांची संख्या जिल्ह्यात ३५ आहे.

मतदार नोंदणीस महिलांचा प्रतिसाद

या मोहिमेत १९ हजार ३४३ मतदारांची वाढ झाली असून, यात महिला मतदारांची संख्या ११ हजार ५६५, तर पुरूष मतदारांची संख्या ७ हजार ८३५ ने वाढल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ७५ हजार मतदारांची वाढ झाली. परंतु त्याचवेळी या निवडणुकीनंतर मागील चार महिन्यांत ५६ हजारांहून अधिक दुबार आणि मृत मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आली आहेत.

First Published on: August 31, 2019 11:56 PM
Exit mobile version