कृषी विधेयकाविरोधात शुक्रवारी आंदोलन

कृषी विधेयकाविरोधात शुक्रवारी आंदोलन

बाळासाहेब थोरात

कृषी विधेयकाविरोधात महसूल मंत्र्यांचं उद्या आंदोलन  केंद्र सरकारनं नुकतंच कृषी विधेयक मंजूर केलंय. या विधेयकावरनं महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह शेतकरी लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी आंदोलन करणार आहेत.

गेल्या आठवडाभरापासनं या विधेयकाविरोधात काँग्रेससह राष्ट्र सेवा दलानेही कृषी उत्पन्न बाजार समितीत निदर्शनं केली. राष्ट्रीय कृषी विधेयक हे तीन पद्धतीने मांडण्यात आलंय. १९५५ नंतर अर्थात तब्बल ६५ वर्षांनंतर कृषी विधेयकात दुरुस्ती करण्यात आलीय. या विधेयकाचं कायद्यात रुपांतरही झालंय.

First Published on: October 1, 2020 5:17 PM
Exit mobile version