मराठा आरक्षणाचा सर्वपक्षीय एल्गार

मराठा आरक्षणाचा सर्वपक्षीय एल्गार

आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात झालेल्या मूक आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी समाजासाठी लढा उभारण्याची ग्वाही दिली. राज्य सरकारच्या पातळीवरील विषयांसाठी विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे. तर केंद्र सरकारच्या पातळीवरील विषयांसाठी महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार वज्रमूठ आवळणार असल्याची ग्वाही या नेत्यांनी समाजाला दिली आहे.

‘समाज बोलला, आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला…अशी भूमिका स्विकारत मराठा समाजाने आरक्षणाचा एल्गार पुकारला आहे. कोल्हापूरपाठोपाठ नाशिकमध्ये दुसरे मूक आंदोलन झाले. या आंदोलनात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, माजी केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, डॉ.भारती पवार आणि आमदारांनीही आपली भूमिका मांडली. मराठा समाजाच्या मागण्या योग्य असून त्यासाठी सर्वेपक्षीय नेत्यांना सोबत घेवून आरक्षणाचा लढा सभाजीराजेंनी उभारला आहे. या लढ्यास निश्चितपणे यश मिळेल. त्यासाठी वेळ पडली तर विधानसभेचे विशेष अधिवेशन घेवू आणि दिल्लीपर्यंत जावू, अशी ग्वाही देत आरक्षणासाठी संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले.

First Published on: June 22, 2021 10:10 AM
Exit mobile version