उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्यासह भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर

उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्यासह भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर

शिवसेना-भाजप

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला गळती लागली असून, विद्यमान उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्यासह माजी उपमहापौर प्रथमेश गिते, कन्नू ताजणे, नगरसेविका हेमलता कांडेकर व माजी नगरसेवक मुशीर सय्यद हे आज सायंकाळी 5 वाजेला सह्याद्री अतिथी गृहावर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती शशिकांत जाधव यांच्या प्रवेशाची चर्चा होत असली तरी ते बाहेरगावी असल्याचे त्यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. दरम्यान, हेमलता कांडेकर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.वर्षभरापूर्वीच माजी आमदार वसंत गिते व उपनेते सुनील बागूल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते व बागूल यांच्या मातोश्री भिकूबाई बागूल या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तसेच सातपूर भागातील नगरसेविका हेमलता कांडेकर व नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मुशीर सय्यद हे देखील शिवबंधन बांधणार असल्याचे समजते. हा प्रवेश सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे 5 वाजेला होणार आहे.
….
भाजपचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांचा प्रवेश सोहळा सायंकाळी 5 वाजेला होणार असून, अजूनही नावे यात समाविष्ठ होणार आहेत. त्यांचीही लवकरच घोषणा करण्यात येईल.
-भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना

First Published on: February 25, 2022 12:17 PM
Exit mobile version