‘हापूस’ अमेरिकेत पाठवण्यास हिरवा कंदील

‘हापूस’ अमेरिकेत पाठवण्यास हिरवा कंदील

लासलगाव येथील या केंद्रात हापूसवर विकिरण प्रक्रिया होणार.

लासलगाव केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रात कोकणचा राजा हापूस आंब्यावर १० एप्रिलपासून विकिरण प्रक्रिया होऊन आंब्याची परदेशी वारी सुरू होणार आहे. २००७ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या आंब्याची लासलगाव येथील केंद्रात अमेरिकेच्या तज्ञांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी आंबा विक्री करून अमेरिकेस पाठवण्यास हिरवा कंदील दिला आहे.

यंदा लासलगाव कृषक या विकिरण केंद्रातून १००० मेट्रिक टन आंब्यावर विकिरण करून पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी मागील वर्षी 490 मेट्रिक टन कांदा विक्री आंबा विकिरण होऊन अमेरिकेला गेला होता. गेल्या पाच वर्षापासून हा प्रकल्प खासगी तत्त्वावर भाभा अणुसंशोधन केंद्राने चालवण्यास दिलेला आहे. लासलगाव येथील केंद्रात पंधरा दिवसापासून यासाठी लगबग सुरू झाली आहे. यावर्षी एक हजार टन आंबा विक्री होण्याची शक्यता आहे असून आंबा विक्रेते आणि आंबा उत्पादकांनी या कंपनीकडे, अशी मागणी केल्याचे समजते. मागील सप्ताहातच वाशी येथील आंबा विकरण केंद्रातून विकिरण प्रक्रिया करून आंबा पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर येथील या सप्ताहात म्हणजे बुधवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि हाच आंबा लासलगावमार्गे अमेरिकेकडे रवाना होणार आहे.

अन्य देशातही कूच…

काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंबा झपाट्याने अमेरिके बरोबरच अन्य देशातही कूच करू लागला आहेत. लासलगावच्या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीच्यावतीने विकिरण प्रक्रिया केली जात आहे. येथील कृषक या पथदर्शक विकीरण प्रक्रिया प्रकल्पात अ‍ॅग्रोसर्ज रेडीयेटर्स (इंडिया) प्रा. लिमीटेड कंपनीचे व्यवस्थापक प्रणव पारेख यांचे मार्गदर्शनाखाली लासलगाव येथील कृषकचे व्यवस्थापन निवासी अधिकारी महेंद्र अवधानी व संजय आहेर काम पाहत आहेत.

येथे होणार निर्यात

आंंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हापूस सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, ह्यूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठवला जाणार आहे .

First Published on: April 10, 2019 8:15 AM
Exit mobile version