शाळा दुरुस्तीची फाईल फाडून टाका!

शाळा दुरुस्तीची फाईल फाडून टाका!

जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीला प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने संतापलेल्या शिक्षण सभापती यतिंद्र पगार यांनी दुरुस्तीच्या फाईल फाडून टाका, मी सभापतीपदाचा राजीनामा देतो, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्यातील शाळा दुरूस्ती फाईलवरून सुरू असलेले वाद अद्यापही मिटलेला नाही. अध्यक्षा शीतल सागंळे यांनी स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी बोलावलेल्या बैठकीतही या वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

शाळा दुरुस्तीची फाईल मंजूर होत नसल्याने आक्रमक झालेल्या सदस्यांनी सभापतीसह शिक्षणाकार्‍यांना फैलावर घेतले. शाळांच्या दुरुस्त्या पावसाळ्यानंतर करणार का, असा संतप्त सवाल सदस्यांनी उपस्थित केला. यानंतर बुधवारी (दि.१४) सभापती पगार यांनी शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांच्याविरोधात अध्यक्षा सांगळे यांची बेट घेऊन तक्रार केली. या वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यक्षा सांगळे यांनी लागलीच, सभापती पगार यांसह सर्व पदाधिकारी, सदस्य व डॉ. झनकर यांची एकत्र बंद दरवाजा आड बैठक घेतली. शाळा दुरूस्तीचे प्रस्ताव मागवताना शााखा अभियंत्यांकडून नजरअंदाज आराखडा मागवला, त्यानंतर प्रत्यक्ष अधिकार्‍यांना पाठवून अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या दोन्ही अंदाजपत्रकात तफावत असल्याने नेमके कोणत्या अंदाजपत्रकांवरून निधी मंजूर करायचा यावर हा वाद रंगला आहे. सर्व सदस्यांना ठराविक निधी मंजूर करण्याची भूमिका सभापती पगार यांनी घेतली आहे . आलेल्या कोणत्या अंदाजपत्रकास मंजुरी द्यायची यावर झनकर यांचे घोडं आडलं असल्याचे समजते. या कारणामुळे दोघांमधील या वाद अगदी टोकला गेला आहे. बैठकीतही सभापती पगार यांनी शिक्षणाधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे सांगत, शाळा दुरुस्ती फाईल मंजूर करत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षणाधिकारी झनकर यांनी जवळच्या नातेवाईक असलेल्या शिक्षकांची पेसातून सोईच्या ठिकाणी बदली करून घेतल्याचा आरोप केला आहे. झनकर यांनी शाळांची प्रत्यक्ष पाहणी अथवा अहवाल घेऊन मंजुरी देणार असल्याची भूमिका मांडली.

हा वाद पुढे सुरूच राहिले यात दोघांकडून आरोप-प्रत्यारोप झाले. यात आक्रमक झालेल्या सभापती पगार यांनी शाळा दुरुस्तीची फाईल फेकून द्या मी काम करणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र, अध्यक्षा सांगळे यांनी मध्यस्थी करत त्यांना शांत केले. या बैठकीत दोघांच्या वादावर काहीही तोडगा निघाला नाही.

First Published on: August 17, 2019 8:04 AM
Exit mobile version