जिद्द असेल तर कोणतेही काम होते : अजित पवार

जिद्द असेल तर कोणतेही काम होते : अजित पवार

नाशिक : अनेक दिवसांपासून आमदार माणिकराव कोकाटे व आमदार आशुतोष काळे यांनी शहा येथील सबस्टेशन व जल योजना यांचे उद्घाटन करावे अशी मागणी केली होती. जिद्द असेल तर कोणते काम होते, सिन्नरच्या पूर्वभागासाठी जिव्हाळ्याचा असलेला वीज प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार कोकाटे यांच्या प्रयत्नातून शहा येथील 132 केव्हीए क्षमतेचे वीज केंद्र मार्गी लागले आहे. जानेवारीत हे वीजकेंद्र बाभळेश्वर येथून पावर ग्रीडच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आले असून वडांगळी, सोमठाणे व देवपूर या उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. ही शेतकरीवर्गासाठी हिताची गोष्ट आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. शहा येथील 132 केवी सब स्टेशन व जलजीवन योजना याचे पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, नरहरी शिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगीरथ शिंदे, सिमंतीनी कोकाटे, बाळासाहेब वाघ, रंजन ठाकरे, रवींद्र पवार, विजय गडाख, राजेंद्र घुमरे, शशिकांत गाडे, विठ्ठल उगले, अक्षय उगले आदी मंचावर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, विद्वेषी वक्तव्ये रोखण्याची जबाबदारी राज्यांचीच असून कारवाईचा बडगा उगारण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. सरकार शक्तिहीन झाले आहे. ते वेळेवर कोणावरही कारवाई करत नाही. जर हे असेच सुरू राहिले तर या सरकारची गरजच काय, राजकीय नेत्यांनी धर्माचा राजकारणासाठी वापर करण्याचे टाळले तर विद्वेषी वक्तव्येही बंद होतील. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. यावरून आता प्रतिक्रिया उमटायला लागल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. कोविडच्या काळात महाविकास आघाडीचे सरकारने चांगले काम केले. डॉक्टर, नर्स, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही दिवस-रात्र काम केले. आम्हाला दोनदा कोरोना झाला पण आम्ही मागे हटलो नाही, असे पवार यांनी सांगितले.

First Published on: March 31, 2023 11:55 AM
Exit mobile version