राजकीय वादातून पळसेत प्राणघातक हल्ला

राजकीय वादातून पळसेत प्राणघातक हल्ला

राजकीय वादातून पळसेतील ग्रामपंचायत सदस्य नवनाथ गायधनी यांच्यावर बुधवारी (दि. २४) सकाळी १० वाजता एका टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत गायधनी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओ क्लिपवर आक्षेप घेत गावातील काहींनी नवनिर्वाचित सदस्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांना फोनवरून शिविगाळ करत धमक्या दिल्याची तक्रार नाशिकरोड पोलिसांत करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी (दि.२२) काही युवकांनी नवनाथ गायधनी यांना धमकी देत धक्काबुक्की केल्याच्या घटनेनंतर गावातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूरज बिजली यांनी दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी नवनाथ गायधनी यांना फोन करत बोलावून घेत जमलेल्या टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

First Published on: February 24, 2021 3:24 PM
Exit mobile version