महिलेने केला भोंदू बाबाचा पर्दाफाश

महिलेने केला भोंदू बाबाचा पर्दाफाश

प्रातिनिधिक फोटो

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष देऊन लैंगिक सबंध ठेऊ पाहणाऱ्या भोंदू बाबाचा नाशिक येथील एका महिलेने छत्रपती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पर्दाफाश केला असून याबाबत निफाड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

कसा घडला प्रकार

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रियंका कुमावत नामक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रसाद जाधव या तरुणाची नाशिक येथे भेट झाल्यावर त्याने निफाड येथे एक बाबा पैशाचा पाऊस पाडतो अशी माहिती दिली. त्यावेळी महिलेने सदर घडलेला प्रकार छत्रपती सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला यावेळी त्यांनी सदर भोंदू बाबाला पकडण्याचे नियोजन केले. त्यानंतर महिलेने प्रसाद जाधव याच्यासोबत सदर बाबाची निफाड येथे भेट घेतली. त्यावेळी भोंदू बाबाने सदर पाऊस पाडण्यासाठी शरीर शुद्धी करावी लागेल त्यासाठी शारिरीक संबंध ठेवावे लागतील अशी माहिती दिली. त्यासाठी वेळ ठरवून महिलेला रूमवर घेऊन जात असताना भोंदू बाबाने महिलेला पावडरच्या पुड्या खाण्यासाठी दिल्या यावेळी काहीतरी विपरीत घडेल हे लक्षात आल्यावर महिलेने छत्रपती सेनेच्या पदाधिकाऱ्यांला एसएमएस करून माहिती दिली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांने तात्काळ निफाड पोलीस स्टेशनशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींना केले गजाआड

यासाठी मागील चार दिवसांपासून छत्रपती सेनेचे पदाधिकारी सदर भोंदू बाबा संतोष वाळीबा नागरे, आरोपी प्रसाद जाधव, आरोपी योगेश सोनार यांच्या मागावर होते. त्यांनी निफाड पोलीस ठाण्याच्या सहकार्याने भोंदू बाबा आणि इतर दोन आरोपीने पकडले. याकामी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मदतीने आरोपींना गजाआड केले आहे.

First Published on: January 14, 2019 8:49 PM
Exit mobile version