महानगरच्या रेसिपी स्पर्धेत नाशिकची वृषाली कावळे ठरली विजेती

महानगरच्या रेसिपी स्पर्धेत नाशिकची वृषाली कावळे ठरली विजेती

रेसिपी स्पर्धेत सहभागी वृषाली कावळे

गणेशोत्सवानिमित्त आपलं महानगर – माय महानगरच्या वतीने घेण्यात आलेल्या बाप्पा स्पेशल रेसिपी स्पर्धेत नाशिकच्या वृषाली भूषण कावळे यांना विशेष बक्षीस जाहीर झाले आहे. कावळे यांनी खास बीटाचे स्टफ गुलकंद खजूर लाडू तयार केले होते. त्यांच्या या रेसिपीला दर्शकांची खास पसंती लाभली. या स्पर्धेला एस.आर. केटरर्सचे प्रायोजकत्त्व लाभले होते.

यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत असताना लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी भक्त सज्ज झाले होते. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून भक्तांनी बाप्पांचे स्वागत केले आणि त्याच उत्साहाने निरोपही दिला. बाहेर कोरोनाचे संकट असताना, घराघरांत मात्र भक्तीमय वातावरण होते. अशा वातावरणात लाडक्या बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होती. गृहिणींच्या या कौशल्याला वाव देण्याहेतूने आपलं महानगर – माय महानगरने ही स्पर्धा घेतली. महानगरतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इको फ्रेंडली स्पर्धेसोबतच यंदाच्या रेसिपी स्पर्धेचे हे पहिले वर्ष होते. त्याला गृहिणींचा उदंड प्रतिसाद लाभला.

स्पर्धेच्या नियमांनुसार ज्या स्पर्धकाच्या रेसिपीच्या व्हिडिओला युट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूव्ज मिळतील, त्या स्पर्धकाला विजेता म्हणून घोषित केले जाणार होते. नुसार विजेत्यांची निवड करण्यात आली. त्यात नाशिक विभागातून वृषाली भूषण कावळे यांना विशेष बक्षीस जाहीर झाले आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेचे पहिले पारितोषिक पुण्यातील ग्रीष्मा महाजन यांना मिळाले. त्यांनी विड्याच्या पानाचे मोदक बनविण्याची रेसिपी पाठवली होती. तर, मुंबईतील मनीषा पालेकर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी कोकोनट जगरी केक बनवण्याची रेसिपी पाठवली होती. याशिवाय मुंबईतीलच ज्योती पाटील यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. त्यांनी बाजरी चणादाळ खिचडा ही रेसिपी पाठवली होती. या सर्व विजेत्यांना लवकरच बक्षीसे देऊन गौरविले जाणार आहे.

First Published on: September 12, 2020 10:40 PM
Exit mobile version