नाशिकमध्ये श्रावणात बिल्व महोत्सव

नाशिकमध्ये श्रावणात बिल्व महोत्सव

श्रावण महिन्यात शिवपूजेसाठी बिल्वपत्राला महत्व असते. केवळ बिल्वपत्रच नव्हे तर संपूर्ण बेलाचे झाड बहुपयोगी ठरते. हे महत्व लक्षात घेत येत्या श्रावण महिन्यात नाशिक शहरात बिल्व महोत्सव घेण्याची महत्वपूर्ण घोषणा प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांनी पर्यावरणदिनी (५ जून) केली. महापालिकेच्या वतीने होणार्‍या या महोत्सवात बेलाची तीन हजार रोपे लावली जातील.

नाशिकमधील देवराई उपक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या सयाजी शिंदे यांनी आयुक्तांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन आगामी योजनांची माहिती दिली. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्वपत्राचा उपयोग केला जातो. त्यामुळे हिंदूधर्मात बेल आणि बिल्वपत्राला पवित्र स्थान आहे. या वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पूजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला आहे. पानांबरोबरच बेलाच्या फळालाही महत्त्व आहे. बेलफळ औषधी म्हणून ओळखले जाते पोटदुखीपासून तर मधुमेहापर्यंतच्या सर्व समस्यांवर बेल गुणकारी आहे. हे महत्व लक्षात घेऊन शहरात बिल्व वृक्षांची संख्या अधिक असावी, या दृष्टीने बिल्व महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात वृक्षारोपणाबरोबरच जनजागृतीचे कामही व्यापक प्रमाणात होणार आहे. यात शहरातील विद्यार्थ्यांना सहभागी करत वृक्ष संवर्धनासाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्यातून वृक्षांसंदर्भात जनजागृती केली जाईल.

बिल्व महोत्सवच का?

शहर ऑक्सिजन पार्क होईल

सातार्‍यामध्ये दरवर्षी झाडांचा उत्सव आयोजित केला जातो. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये श्रावण महिन्यात बेलाचा महोत्सव घेतला जाणार आहे. या काळात नागरिकांनीही बेलाची रोपे लावल्यास शहर ऑक्सिजन पार्क होण्यास वेळ लागणार नाही.
– सयाजी शिंदे, प्रसिद्ध अभिनेता

First Published on: June 6, 2019 8:36 AM
Exit mobile version