सावधान! नाशिकमध्ये डोळ्यांची साथ, रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; ‘अशी’ घ्या काळजी

सावधान! नाशिकमध्ये डोळ्यांची साथ, रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; ‘अशी’ घ्या काळजी

दिलीप कोठावदे । नाशिक

सध्या नाशिकमध्ये डोळे येण्याची साथ आल्याचे निदर्शनास आले असून बहुसंख्य नेत्र विकार तज्ञांकडे डोळ्यांच्या तक्रारी करणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसर्‍या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन नेत्र विकार तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.

डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो, त्याला कॅान्जुक्टीव्ह म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊन डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. डोळे आल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारामुळे आले आहेत, याचे निदान करून उपचार करायला हवेत. काहीवेळा संसर्गामुळे डोळे येतात तर काहीवेळा ऍलर्जीमुळे डोळे येतात.

सद्यस्थितीत पावसाळी वातावरणातील बदलांमुळे डोळे येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं रुग्णांनी बाहेर जाणं टाळावं, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. तसेच, या साथीचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णांनी घरी बसून आराम करावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या चारपाच दिवसांपासून डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते,डोळे चुरचुरतात, खुपतात अशीच काहीशी लक्षणं दिसून येत आहेत.

डोळ्यांवर घरगुती उपाय करू नका.

डोळे हा अतिशय महत्वाचा आणि नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळे येण्याच्या तक्रारीसाठी घरगुती उपचार करू नयेत. दुसर्‍याची औषधे वापरू नयेत तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

संसर्ग होण्याचे कारण 

ही आहेत लक्षण

अशी घ्या काळजी 

सद्यस्थितीत डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यांच्या विकारात, डोळे येणे हा प्रकार संसर्गजन्य असून लवकर पसरणारा आजार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला तरी घरातील सर्वांना याची बाधा होऊ शकते. शाळकरी मुले किंवा अधिक लोकसंपर्क असलेल्या बाधित व्यक्ती या आजाराचे वाहक असतात. हा आजार लहान-मोठ्या सर्वांनाच होऊ शकतो. त्यामुळे या आजारात वरील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. : डॉ.भावना बागड, नेत्र विकार तज्ञ

First Published on: July 24, 2023 9:18 PM
Exit mobile version