निर्मळ मनातच भगवंत आचार्य कौशिकजी महाराज

निर्मळ मनातच भगवंत  आचार्य कौशिकजी महाराज

देशातील शेवटच्या व्यक्तीसाठी राजकारणाची कवाडे खुली करणारा व्यक्तीच खर्‍या अर्थाने देशाचा यशस्वी राजा बनतो आणि असा राजा आजवर केवळ प्रभू श्रीरामचंद्र बनू शकले, असे सांगतानाच महाराज म्हणाले की, विचार जेव्हा शुद्ध असतात तेव्हा मन देवाच्या नामस्मरणात गुंतून जाते. यात मन निर्मळ होते आणि अशावेळी त्या मनात स्वतः भगवंत आपले स्थान निर्माण करतात. त्यामुळेच भक्तीमार्गावर निर्मळ मनाचे महात्म्य महत्त्वाचे मानले गेले आहे.

नाशिक : श्री कामधेनू कर्करोग रुग्णालयाच्या समर्थनार्थ परमपूज्य पुराण मनीषी आचार्य श्री कौशिकजी महाराज यांच्या पावन सानिध्यात श्रीराम कथा आणि श्री शिव महारुद्राभिषेक सोहळ्याला पंचवटीत गुरुवारी (दि.१८) प्रारंभ झाला.
विश्व जागरण मानव सेवा संघ चॅरिटी ट्रस्ट, तुलसी तपोवन गोशाळा वृंदावन यांच्या वतीने १७ ते २७ ऑगस्ट या कालावधीत श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनलक्ष्मी बँक्वेट हॉल अँड लॉन्स, निलगिरी बागेसमोर, कैलास नगर, औरंगाबाद रोड, पंचवटी या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी शहरासह विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. कथेला सुरुवात करण्यापूर्वी भक्तांनी परमपूज्य पुराण मनीषी आचार्य श्री कौशिकजी महाराजांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला. त्यानंतर महाराजांचे दर्शन घेतल. आरतीनंतर श्रीराम कथेला सुरुवात झाली. सकाळी ११ते दुपारी ३ वाजेदरम्यान कथा सुरू होती. या श्रीराम कथेचे महाराजांच्या सुमधुर वाणीतून सर्व भगवंतभक्तांनी मनोभावे श्रवण केले. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी विविध दाखले देत महाराजांनी महाराजांनी श्रीराम कथा विशद केली.

First Published on: August 19, 2022 2:00 PM
Exit mobile version