नाशकात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद : बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत

नाशकात भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद : बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत

देशभरातील नागरिकांना घातक ठरणारे शेतकरी विरोधी कायदे, इंधन दरवाढ, कामगार विरोधी कायदे यांच्या विरोधात देशातील ५०० पेक्षा अधिक शेतकरी संघटना आणि २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्यावतीने आज भारत बंद पुकारण्यात आला. या बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानं बाजारपेठेवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.

सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, काँग्रेस, शिवसेना, सीटू यांसह अन्य पक्ष आणि संघटनांनी संयुक्तपणे त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, मोरवाडी परिसरातून रॅली काढत व्यावसायिकांना भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.या रॅलीच्या वेळी व्यावसायिकांनी काहीवेळ दुकाने बंद केली मात्र रॅलीची पाठ फिरताच सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबड पोलिसांद्वारे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फेरीमध्ये माकप नेते ऍड.तानाजी जायभावे, नाशिक पश्चिम राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादी अध्यक्ष मकरंद सोमवंशी, शिवसेना विभाग प्रमुख सुयश पाटील, आप चे सुमित शर्मा, युवक उपाध्यक्ष कृष्णा काळे, सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे, माथाडी कामगार नेते मुकेश शेवाळे,भरत पाटील, इम्रान अन्सारी, देवेंद्र देशपांडे, सुरज चव्हाण, शिवम अलई यांच्यासह सिटूचे कामगार आणि नेते सहभागी झाले होते.

First Published on: September 27, 2021 6:07 PM
Exit mobile version