‘बॉईज टाऊन’च्या फिजिकल जीम ट्रेनरची आत्महत्या

‘बॉईज टाऊन’च्या फिजिकल जीम ट्रेनरची आत्महत्या

नाशिक : बॉईज टाऊन स्कूलच्या फिजिकल जीम ट्रेनरने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल  दुपारी २ वाजेदरम्यान मखमलाबाद रोड येथील नेचर ब्लीस इमारतीत घडली. माणिक संपत तळेकर (वय ४५, रा. शासकीय विश्रामगृहाजवळ, त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक) असे मृत्यू झालेल्या जीम ट्रेनरचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त चोैकातील वेस्ट विंड मेडोज इमारतीमध्ये काहीजणांनी एक महिन्यापूर्वी जीम सुरु केली होती. या जिममध्ये माणिक तळेकर संंबंधितांकडून व्यायाम करून घ्यायचे. मात्र त्यांनी डिसेंबरपासून वेस्ट विंड मेडोज इमारतीमध्ये जाणे बंद केले होते. असे असले तरी ते अचानक शुक्रवारी (दि.९) इमारतीमध्ये आले. त्यानंतर त्यांनी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत. आत्महत्येचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजूशकले नाही.

First Published on: December 10, 2022 10:32 AM
Exit mobile version