दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा

दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा

नाशिक :  शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गड-किल्ल्यांची ओळख व्हावी.. निसर्ग, पाणी, माती, चिखल आदींशी स्वच्छंदी मनाने एकरुपता साधता यावी याकरीता सार्वजनिक वाचनालय, सानेगुरूजी कथामाला व लायन्स क्लब पंचवटीच्यावतीने किल्ले बनविण्याची स्पर्धा आयाजित करण्यात आली आहे. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता गंगापूर रोडवरील गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालय येथे ही स्पर्धा होणार आहे.

दिवाळी म्हटले की, नवीन कपडे, फटाके, रांगोळी, गोडधोड फराळ हे तर आलेच ; पण त्यातही बच्चे कंपनीसाठी औत्सुक्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे किल्ले बनवणे. परंतु, दिवाळीच्या सुटया आणि अंगणात चिमुकल्यांनी बनवलेले मातीचे किल्ले आता पहायला मिळत नाही. ही संस्कृती नष्ट होऊ नये यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यंदा किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत चार ते पाच विद्यार्थ्यांनी मिळून किल्ला बनवायचा आहे. किल्ले सजावटीचे साहित्य स्वतः आणायचे आहे.

स्पर्धेसाठी लागणारी माती बालभवनतर्फे देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धा १९ ऑक्टोबर रोजी गंगापूर रोडवरी गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालय आणि सार्वजनिक वाचनालय येथे सकाळी १०: ते ११: या वेळेत होणार आहे. किल्ले बनविण्यासाठी मूर्तिकार आनंद ताबंट हे प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देणार आहेत.

येथे करा नाव नोंदणी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गंगापूर रोडवरील डॉ. नेर्लीकर हॉस्पिटलजवळील गो.ह.देशपांडे उद्यान वाचनालय तसेच प. सा. नाटय गृहाशेजारील सार्वजनिक वाचनालयात १५ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नाव नोंदणीसाठी ८६०५६०३००२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किल्ल्यांना विद्यार्थ्यांचे नाव देणार
विद्यार्थ्यांनी तयार केलेले किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिककरांनाही किल्ले बघण्याची संधी मिळणार आहे. या किल्ल्यांचा विद्यार्थ्यांची नावे देण्यात येणार आहे.

First Published on: October 12, 2022 12:59 PM
Exit mobile version