माजी महापौर पांडेंच्या फार्म हाऊसमध्ये घरफोडी

माजी महापौर पांडेंच्या फार्म हाऊसमध्ये घरफोडी

माजी महापौर विनायक पांडे यांच्या औरंगाबाद रोडवरील ओढा शिवारात असलेल्या फार्मे हाऊसमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत घरातील ३८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फार्म हाऊसमध्ये कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरकाव केला. त्यांनी खोलीतील एलईडी टीव्ही, सेटटॉप बॉक्स, डीव्हीडी असा एकूण ३८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ओढा शिवारात रेल्वे पुलाजवळ गट नं- २२७ फार्म हाऊस येथे घडली. याप्रकरणी ऋतुराज विनायक पांडे यांनी आडगाव पोलिसांत तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक घाडगे अधिक तपास करत आहेत. औरंगाबाद रोडवर असलेल्या पांडे यांच्या फार्म हाऊसवर आजवर विविध टीव्ही सिरियल्सचे शूटिंगही झालेले आहे.

First Published on: April 8, 2019 9:40 PM
Exit mobile version