कँडल वार: महिलेविषयी अश्लिल पोस्ट; भाजपा आयटी सेल पदाधिका-याला अटक

कँडल वार: महिलेविषयी अश्लिल पोस्ट; भाजपा आयटी सेल पदाधिका-याला अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी मेणबत्त्या पेटवण्याचे आवाहन केल्यानंतर सोशल मीडियावर मोदी समर्थक आणि विरोधकांत टोकाचे वाद सुरू आहेत. त्यातून वैयक्तिक चरित्रहनन करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अशाच एका प्रकरणात भाजप आयटी सेलच्या पदाधिकाऱ्याविरोधात एका महिला पत्रकाराने नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना आजाराने संपूर्ण जगाला हादरवून सोडलेले असताना भारतात मात्र ‘कँडल वार’  सुरू आहे. एका वृत्त वाहिनीच्या महिला प्रतिनिधींनी करोनाच्या पार्श्वभुमीवर थाळी नाद व मेणबत्ती आवाहनवर टीका करत ‘संकट काय.. सुरुये काय..? ‘असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला. त्यावर नाशिक जिल्हा भाजपा सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी विजयराज जाधव यांनी महिलेची वैयक्तिक बदनामी होईल असे प्रत्युत्तर देणारा मजकूर टाकला. त्यानंतर सोशल मीडियावर या पदाधिका-याविरोधात टीकेची झोड उठली. संबंधित महिलेच्या तक्रारी नंतर ओझर पोलीस ठाण्यात जाधव यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
First Published on: April 4, 2020 1:13 PM
Exit mobile version